Skip to content

उत्तरे तुमच्या प्रश्‍नांची

मार्च 20, 2009

प्रश्‍न – माझी मुलगी 12 वर्षांची आहे पण सध्या तिच्या केसात दोन-तीन पांढरे केस मिळाले. तिच्या केसात भरपूर कोंडाही होतो, तरी यावर काही उपाय सुचवावा. संगणकासमोर आठ तास काम केल्यावर डोळे दुखतात. डोळ्यांचा शीण घालविण्यासाठी काही अंजन सुचवावे.
– हर्षदा मोडक, पुणे
उत्तर – केस पांढरे होणे, केसात कोंडा होणे हे मुख्यत्वे पित्त असंतुलनाचे लक्षण आहे. तसेच के”सांना हवे ते पोषण न मिळाल्यानेही केस अकाली पांढरे होऊ शकतात. केसांना हितकर द्रव्यांनी सिद्ध केलेल्या “संतुलन व्हिलेज हेअर तेला”सारखे तेल रोज केसांना लावणे व शिकेकाई, रिठा, नागरमोथा वगैरे द्रव्यांनी किंवा तयार “सुकेशा’ मिश्रणाने केस धुणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रासायनिक द्रव्यांपासून बनविलेल्या उत्पादनांचा वापर केसांसाठी न करणे हे सर्व केसांसाठी हितकर होय. पित्तसंतुलनासाठी “सॅन रोझ (शांती रोझ)’, “संतुलन पित्तशांती गोळ्या’ तसेच केसांच्या पोषणासाठी “हेअरसॅन गोळ्या” घेणेही चांगले. संगणकामुळे डोळ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी “सॅन अंजन – क्‍लिअर’ सारखे अंजन डोळ्यात घालण्याचाही उपयोग होतो. डोळ्यांचा शीण घालविण्यासाठी डोळ्यांवर गुलाबपाण्याच्या घड्या ठेवणे, संगणकावर सतत आठ तास काम न करता अधून मधून पाच मिनिटे डोळे मिटून डोळ्यांना विश्रांती देणे, तोंडात चूळ भरून गाल फुगवून डोळ्यावर थंड पाण्याचे हबके मारणे वगैरे उपाय केल्यास डोळ्यांवर येणारा ताण कमी व्हायला मदत होते.
प्रश्‍न – मी “फॅमिली डॉक्‍टर”ची नियमित वाचक आहे. माझे वय 16 वर्षे असून माझ्या चेहऱ्यावर खूप मुरुमे आहेत. तसेच दिवसेंदिवस त्वचा काळवंडत चालली आहे. माझी उंची चार फूट नऊ इंच इतकी कमी आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
– मंजिरी देशमुख, पुणे
उत्तर – मुरमे, त्वचा काळवंडणे वगैरे त्रास शरीरामधल्या व रक्‍तामधल्या अशुद्धीमुळे होऊ शकतात. पाळी नियमित येते आहे व पुरेसा रक्‍तस्राव होतो आहे, तसेच पोट साफ होत आहे याकडे लक्ष ठेवावे. रक्‍तशुद्धीच्या दृष्टीने मंजिसार आसव, “मंजिष्ठासॅन गोळ्या’ वगैरे औषध घेण्याचा उपयोग होताना दिसतो. चेहऱ्याला “संतुलन रोझ ब्युटी’सारखे तेल व संपूर्ण अंगाला “संतुलन अभ्यंग तेला”सारखे तेल लावण्याचाही चांगला उपयोग होईल.
स्नान करतेवेळी साबणाऐवजी “सॅन मसाज पावडर”सारखे रक्‍तशुद्धीकर द्रव्यांनी तयार केलेले उटणे वापरणेही उत्तम असते. अस्थीधातूची ताकद वाढवणारे योग उदा. “मॅरोसॅन” रसायन, डिंकाचे लाडू, दूध, खारीक चूर्ण वगैरे घेण्याचा उंची वाढण्यासाठी उपयोग होऊ शकतो.
प्रश्‍न – मी “फॅमिली डॉक्‍टर” नियमित वाचते तसेच “साम” वाहिनीवरील आपले कार्यक्रम नियमित पाहते. त्यात तुम्ही कोरफडीचा गर खाण्याबद्दल सांगितले होते. मी एकदा चमचाभर कोरफडीचा गर खाऊन बघितला पण पुन्हा खाण्याची हिंमत होत नाही. कृपया कोरफड कशी खाता येईल याविषयी मार्गदर्शन करावे.
– मेधा काकडे, पुणे
उत्तर – चिकट व बुळबुळीत असल्याने काही जणांना कोरफडीचा गर घेणे अवघड जाते. हा चिकटपणा कमी करण्यासाठी खालील प्रयोग करता येतो. छोट्या कढईमध्ये चमचाभर कोरफडीचा गर टाकून मंद आचेवर परतून घ्यावा. चिकटपणा कमी झाला की त्यावर चिमूटभर हळद टाकून सेवन करावा. अथवा कोरफडीचा गर पाण्याच्या घोटाबरोबर गिळणेही सोपे जाते.
प्रश्‍न – मला तीन वर्षांपासून डोकेदुखीचा खूप त्रास आहे. कधी डोक्‍याचा मागचा भाग, कधी मस्तकावरचा भाग तर कधी कानाच्या वरील डोक्‍याचा भाग दुखतो. हे दुखणे मला बारावी पासून सुरू झाले आहे. झोपायला वेळेत जाऊनही मला वेळेवर झोप लागत नाही, कृपया सल्ला द्यावा.
– शीतल जोशी, पुणे
उत्तर – वेळेवर झोप न मिळाल्याने पित्त वाढल्याने अशा प्रकारे डोके दुखू शकते. यासाठी पादाभ्यंग उत्तम ठरावा. पादाभ्यंग म्हणजे तळपायांना “संतुलन पादाभ्यंग घृत’ लावून शुद्ध काशाच्या वाटीने 10-10 मिनिटे चोळणे. याप्रमाणे काही दिवस रोज पादाभ्यंग करण्याचा उपयोग होईल. रात्री झोपण्यापूर्वी नाकात साजूक तुपाचे किंवा “नस्यसॅन घृता”चे दोन-तीन थेंब टाकण्याचाही उपयोग होईल.
पित्त कमी होण्याच्या दृष्टीने “सॅनकूल चूर्ण”, “संतुलन पित्तशांती गोळ्या”, अविपत्तिकर चूर्ण घेण्याचाही उपयोग होईल. रात्री झोपताना योगनिद्रा संगीत ऐकण्यानेही मन शांत होऊन झोप लागायला मदत मिळते. दहा मिनिटे ॐकार म्हणण्याचाही उपयोग होतो.
– डॉ. श्री. बालाजी तांबे
Advertisements
No comments yet

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: