Skip to content

आरोग्य सुभाषित

मे 21, 2008

आरोग्य सुभाषित

व्याघ्रीव तिष्ठति जरा परितर्जयन्ती
रोगाश्‍च शत्रव इति प्रहरन्ति देहम्‌ । …….
आयुः परिस्रवति भिन्नघटादिवाम्भो-
लोकस्तथाप्यहितमाचरतीति चित्रम्‌ ।।

वाघिणीप्रमाणे वृद्धावस्था माणसाला घाबरवत असते, शत्रूप्रमाणे रोग शरीरावर प्रहार करत असतात, चीर पडलेल्या मातीच्या घटातून पाणी झिरपते त्याप्रमाणे आयुष्य क्षणाक्षणाने संपून जात असते, तरीही मनुष्य अहिताच्याच गोष्टी करत असतो, हे केवढे आश्‍चर्य?

“जिवासवे जन्मे मृत्यू’ हे तर खरेच, पण आहे तेवढे आयुष्य सुखासमाधानाने जाण्यासाठी प्रयत्नांचीच आवश्‍यकता असते व त्यासाठी तिन्ही स्तरांवर प्रयत्न करावे लागतात. शारीरिक आरोग्य नीट राहण्यासाठी वैयक्‍तिक आहार-आचरणाला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व सामाजिक आरोग्यालाही आहे. रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येकाला स्वतःच्या शरीराची जशी काळजी घ्यायला हवी तशीच किंबहुना त्याहून जास्ती काळजी आपल्या परिसराची (स्वच्छता राखणे, प्रदूषणाला आळा घालणे) घेणे आवश्‍यक आहे तरच साथीच्या रोगांचे प्रमाण कमी राहून सर्वांनाच आरोग्य व पर्यायाने सुख मिळेल.

संकलन – डॉ. सौ. वीणा तांबे

Advertisements
No comments yet

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: